*शिर्षक :- गरीबाचे मागणे एकच परमेश्वरा*🙏🏻🙏🏻😒😒😒
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आमचे उठणे, बसणे खाणे,पीने*
*आणि रात्र होताच तिथेच झोपणे*
*मग सांगशील का मला परमेश्वरा*
*क्षणाक्षणाचे हे आमचे असे का मरणे..?*
*माणसाला गरिबी म्हणून लागलेली*
*अशी ही कीड कधी संपेल का.?*
*एक दिवस तरी परमेश्वरा आम्हाला*
*कधी पोटापुरते खाणे भेटेल का..?*
*कित्येकांना तु धनात लोवळतोस*
*कित्येकांना तू ऐश्वर्यात खेळवतोस*
*मग आम्हीच अस काय पाप केल की*
*आम्हाला पोटासाठी नेहमीच छळतोस..?*
*अस तडफडत ठेऊन आम्हाला*
*का तु अशी आमची परिक्षा घेतोस..?*
*कोणत्या जन्माचे असे हे भोग तू*
*आमच्या गरीबांच्या वाट्याला देतोस*
*उकिरड्यावरचे आहे असे आमचे जगणे*
*आणि सडलेले अन्न खाऊन येथेच मरणे*
*ना कोणाचा आधार ना कोणाची साथ आहे*
*आज दिवसही तुझाच आणि रात्रही तुझीच आहे.....*
*करूणाकरा पोटभर अन्न नाही राहुदे पण*
*भुकेपुरता तरी थोडस अन्न आम्हाला दे रे*
*कधीतरी वळून एकदा बघ आमच्याकडे*
*एकच मागणे आम्ही मागतोय तुझ्याकडे*
*करुणाकरा......*🙏🏻😒
*परमेश्वरा........*🙏🏻😒
*विश्वेश्वरा.......*🙏🏻😔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*स्वलिखित :- प्रेमकवी सागर डवरी✍🏼*
*3 jan 3:58 pm संपन्न*
*दुरध्वनी :- 9082766848*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment