✍🏻माझी कविता📝
👳🏼जबाबदार नागरिक👤
*********************
विचारतो मी एक प्रश्न तुला
वाईट मजला समजू नकोस
सांग मला तू सारे मित्रा
मनात काही ठेऊ नकोस
स्वत्ःला या देशाचा
एक जबाबदार
नागरिक समजतोस तू
मग मला सांग
रस्त्यावरच्या भुकेल्यांना
किती वेळा अन्न देतोस तू ?
किती वेळा अनाथांना
मदत करतोस तू ? सांग
मंदिराबाहेरच्या भीका-याला
किती वेळा मदत करतोस तू ?
केलीही असशील मदत ,
दिलेही असशील अन्न
नाही म्हणत नाही मी
पण हे सार करतानाही
खुप विचार करतोस तू
हे सार करताना
अहंकारी बनतोस तू
मीच का नेहमी पुढे व्हायचे
मीच का भिका-याला पैसे द्यायचे
याच भ्रमात असतोस तू
अरे देनारे खुप असतात रे
पण तुझ्यापासून सुरवात कर तू
त्यांच्यातलाच मी एक समजून
तूझ्याजवळचा एक पैका
गरीबाला देत जा तू
जसे ते माणूस आहेत
तसाच एक माणूस तू
स्वत्ःला गरीब नको समजू तू
स्वताचा विचार न करता
जगाबरोबर चालने शिक तू
स्वत्ःजवळचे थोडेफार
वाटण्यास शिक तु
दररोज नाही पण
कधी कधी दानी बन तू
कमी नाही पडनार तुला
जरी केलीस मदत तू
तेच सर्व करताना त्यांच्या
चेहऱ्यावरचे हासु बन तू
त्यांनी दिलेल्या आशिर्वादाचे
कारण बन तू
या सर्वाला स्वतःच एक
कर्तव्य समज तू
तेव्हाच स्वत्ःला या देशाचा
नागरिक समज तू
*********************
✍🏻माझी कविता📝
😎सागर डवरी💐
💝प्रेमकवि 🌹
📲 व्हाँटसप नं 9773325548
ताः 18/10/2016 6:45 am
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
No comments:
Post a Comment