:'( 😰 काळ जागा झाला.... 😰 :'(
असा कसा सोकावला
काळ जागा झाला
काळजाच्या तुकड्याला
अलगद त्याने दूर केला
नाही जग पाहिले त्याने
माया ममता न पाहिली
मायेची त्या वेडी माया
आधुरीच राहिली
असा कसा सोकावला
काळ जागा झाला....
दुःख किती साहिले तिने
वेदनांचा ताप झाला
वेदनेला सावरण्याला
कोणी नाही जवळी आला
असा कसा सोकावला
काळ जागा झाला......
बाप असा अभागी मी
नाही बोलू शकलो काही
पाहण्यास त्या रूपाला
तरसत राहिलो ठायी
असा कसा सोकावला
काळ जागा झाला....
येशिल तू पुन्हा आता
रुप नवे घेवोनिया
वाट तुझी पाहतो आम्ही
ह्दयी आठव जपूनीया
असा कसा सोकावला
काळ जागा झाला.......
काळजाच्या तुकड्याला
अलगद त्याने दुर केला
रचना :- प्रेमकवी सागर डवरी
दुरध्वनी :- 9773325548
No comments:
Post a Comment