✍ माझी कविता ✍
👸आज तुझी खुप आठवण येतेय👰
**************************
आज का कोणास ठाऊक
पण तुझी खुप.. आठवण येतेय
तुझ्यासोबत घालवलेल्या
प्रत्येक क्षणांची मनात साठवण
होतेय
झालीस दुर तेव्हा तेव्हाच तुला
मी पुरता विसरून गेलोय
तरीही का तुझी आज पुन्हा
आठवण येतेय
आज का कोणास ठाऊक......
तु जाताना सोडून मला
एकदाही मागे पाहीले न्हवते
तुझ्याच आठवणीत आजपर्यंत
मि खुप अश्रू वाहिले होते
त्या अश्रूची आज मनामध्ये
पुन्हा गंगा वाहतेय
आज का कोणास ठाऊक.......
तुझ्यासोबत तेव्हा मी
गोड स्वप्न पाहिले होते
पण तु नसताना ते आज
अधूरेच मनात राहिले होते
ते स्वप्न आज पुन्हा
मला का ग सतावतेय
आज का कोणास ठाऊक.....
मनात आज पुन्हा का
प्रेमाचे वादळ येतेय
तोडून त्या भावणांना
बाहेर येऊ पाहतेय
त्याला कसे माहित
या मनात तू राहतेय
थोपवून भावनाना का
तुझीच ते वाट पाहतेय
आज का कोणास ठाऊक
पण तुझी खुप.. आठवण येतेय
तुझी खुप.. आठवण येतेय
**************************
📝 माझी कविता 📝
😎 सागर डवरी 😎
💘प्रेमकवि❣
व्हाँटसप नं 9773325548
ताः 22/03/2016
11:30 am
🙏 धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment