मुंबई विरारमधे आज सकाळी पहिल्या पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तेव्हा सुचलेली ही कविता सर्वांसाठी शेअर करत आहे
📝माझी कविता✍🏻
🌧पहिला पाऊस
पहिलीच शुभेच्छा
⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈
➖➖➖➖➖➖➖➖
पहिला पाऊस
पहिलाच भास
पहिलाच मातीचा
पहिलाच सुवास
नवा गंध नवा आनंद
ओल्या मातीचा नवा सुगंध
पहिल्याच पावसाची
पहिलीच ती भेट
भेट प्रियेची झालीय थेट
मग पुन्हा नव्या आठवणी
नव्या गप्पा, नवी ओळख
पहिल्याच पावसाचा
पहिलाच दिवस
वरुण राजास जणू
चकोराचे नवस
कोकिळ लपुन
झुडपामधे गातेय
जणू पावसाचे गाणे
पहिल्या पावसाच्या
पहिल्याच सरी
कोसळल्या त्या
माझिया दारी
भिजूनी मी चिंब झालो
मन झाले झिरीमीरी
झाडे वेली नटली धरती
नटले सारे पशु अन पक्षी
काव्य लिहिता भेटली सागरास
लिहिण्याची एक नवीन स्फुर्ती
हा पावसाळा सर्वांना
नवीन प्रेरणा द्यावा
हिच आहे वेडी इच्छा
पहिल्याच पावसाच्या
पहील्याच शुभेच्छा
➖➖➖➖➖➖➖➖
सागर डवरी प्रेमकवि
व्हाँटसप नं 9773325548
ताः 13/05/2017
10:15am
🙏🏼 धन्यवाद 🙏🏼
No comments:
Post a Comment