*कविता माझे बाळ👶🏻 आहे✍🏻🥰*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*कोण छोटा, कोण मोठा*
*येथे काहीच अंतर नसत*
*प्रामाणिक राहता तिच्याशी*
*कवितेला दुसरं नाव नसत*
*कित्येक रात्र रात्र जागून*
*कविता स्मरावी लागते*
*शब्दाशब्दांनी कागदावर*
*कविता उतरावी लागते*
*कवितेला ना जात असते*
*कवितेला ना धर्म असतो*
*कवितेला जो जपत असतो*
*तोच तिचा जन्मदाता असतो*
*कविता साजीरवाणी असते*
*कविता गोजीरवाणी असते*
*कविताच लडीवाळ असते*
*कविता माझे बाळ असते*
*कविता आपलीच असते*
*आपण कवितेचे असतो*
*तिच्यामधे अन् माझ्यामधे*
*कसलाच भेदभाव नसतो*
*कविता जगावी लागते*
*कविता पहावी लागते*
*हृदयाला तोलून तोलून*
*कविता लिहावी लागते*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*लेखन :- प्रेमकवी सागर डवरी🥰🙏🏻✍🏻💐*
*लेखन:-२७ मार्च २०२१ दुपारी १२ वाजून ०५ मिनीटांनी संपन्न*
No comments:
Post a Comment