*मोल स्वातंत्र्याचे🇮🇳🙏🏻🥰💪🏼💐✍🏻*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*जाणून घ्यावे एकदा आपण मोल स्वातंत्र्याचे*
*चला हो गाऊया मिळून सारे गीत स्वातंत्र्याचे*
*हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई आपण सारे भाऊ*
*नका कोणीही यावर त्या जातीचे लेबल लावू*
*विचारा लढना-या जवानांस मोल स्वातंत्र्याचे*
*चला हो गाऊया मिळून सारे गीत स्वातंत्र्याचे*
*कित्येकांनी सांडले या हो रक्त स्वातंत्र्यासाठी*
*कित्येक झाले शहीद या फक्त स्वातंत्र्यासाठी*
*एकच मनात ध्येय त्यांचे ते फक्त स्वातंत्र्याचे*
*चला हो गाऊया मिळून सारे गीत स्वातंत्र्याचे*
*भगतसिंग,सुखदेव,राजगूरूंचे बलिदान याद करू*
*सिमेवरील शहिदांना चला श्रद्धांजली अर्पण करू*
*आपण सारे आहोत यारहो मित स्वातंत्र्याचे*
*चला हो गाऊया मिळून सारे गीत स्वातंत्र्याचे*
*सर्व भारतीयांच्या ओठांवर यावे गीत स्वातंत्र्याचे*
*चला हो गाऊया मिळून सारे गीत स्वातंत्र्याचे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*लेखन प्रेमकवी सागर✍🏻💐 🥰*
*शनिवार १५ अॉगष्ट २०२०, २:१५ दुपारी संपन्न*
No comments:
Post a Comment