#माझ्या आईच्या जात्यावरील ओव्या*✍🏼😊
काल परत एकदा मी पुन्हा बालपणाच्या आठवणीत हरवून गेलो
माझ्या बालपणी मी पहाटे पहाटे आईच्या तोंडून जात्यावरील ओव्या ऐकत साखर झोप घेत असायचो प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणी असा अणुभव आला असेल किंवा नसेलही पण मी हा अणुभव घेतलाय ...आईची जात्यावरील ओवी जेव्हा गायची तेव्हा आमची साखरझोप तीच्या मांडीवरच पुर्ण व्हायची.
खरच तेव्हा खुप छान झोप यायची
आईची ओवी ऐकली की मन भरून जात असे. एक सुंदर ओढ असायची त्या गीतात आई छान आवाजात गात व पहाटेच ते जात्याच घरघर करणे, बाहेरील पक्षाचे ते पहाटेचे सुमधुर आवाजात छान घरभर आवाज घुमायचा जात्याचा त्यातच सुमधूर आवाजात माझ्या आईची ओवी मी ऐकायचो....
आता पाच सहा दिवसापुर्वी आई गावावारून माझ्याकडे मुंबईला आलीय काही दिवसांसाठी ...आणि काल माझ्या आईशी खुप छान गप्पा रंगल्या त्यातूनच माझे बालपणीचे दिवस मला आठवत गेले
खुप वर्षानंतर असा योग आला कि मला आईच्या तोंडून त्या जात्यावरील ओव्या पुन्हा ऐकण्याची हौस वाटली ..
मी आईला म्हटले आई बोल ना ग त्या तुझ्या जात्यावरील ओव्या
मला खुप आवडतात
आई म्हणाली ..बाळा आता सगळ नाही रे आठवत या सगळ्या व्यापातून विसरले मी ते सगळ
पण मी म्हटले थोड तरी बोल मला ऐकायच आहे...
आणि मग मी आज पुन्हा खुप वर्षानंतर पुन्हा एकदा लहान झालो व आईच्या मांडीवर डोके ठेऊन तीच्या ओव्या ऐकू लागलो....
खरच असे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत परत कधी असा क्षण येईल माहीत नाही पण मी तीच्या काही ओव्या माझ्या जीवन कुपीत ठेवल्या बरं सांभाळून
खाली दोन ओव्या देत आहे ज्या मी आईच्या तोंडून ऐकल्या...,,खुप बरे वाटल्या त्या रात्री खरच मला शांत झोप लागली
*#माझ्या आईची पहाटेची जात्यावरील ओवी (१)*
बाई थोरल माझ ग घर
म्होर लोटितो माग क्योर
आठ खिडक्या नऊ दार
बाई थोरल माझ घर
बाई थोरल माझ घर
मला पुरणा सयपाकाला
बाई थोरला दिरदाजी
सोपा काढुया बैठकीला
बाई चौघ ग माझ दिर
हिरव्या शालूचा भरतार
बाई चवघी आम्ही जावा
जावा नंदाच माझ घर
कपाळीच ग कुंकू माझ
महिण्याला ग लाग शेर
बाई थोरल माझ घर
कोणी काढील किर मोर
म्होरल्या सोप्यावरी
करणी धाकट्या दिराईची
बाई थोरल माझ घर
हांडी गलास लोंबत्यात
काऊ चिऊची ग झुंड
त्याला पाखर झोंबत्यात
काई ननंद आक्काबाई
रंग महालाची माझी पेटी
त्यात ठेवीली ठेवीली ग
कंथ कुंकबिवाची चिटी
*#माझ्या आईची पहाटेची जात्यावरील ओवी ( २ )*
बाई झाल्याता तिन्ही सांजा
आली दौड ग शेळीईची
तान्ह्या ग बाळाईची
बाग मोडीली केळीईची
बाई झाल्याता तिन्ही सांजा
आली दौड ग गाईईची
तान्या ग बाळाईची
बाग मोडली जाईईची
झाल्यात तिन्ही सांजा
आली दौड ग म्हैशीईची
तान्या ग बाळाईची
बाग मोडीली मेशीईची
तान्या या बाळाचा
दारी पलंग वकीलाचा
बाई सागर ग तान्हा बाळा
दिवा जळतो राँकेलाचा
दिवा जळतो लोण्यायाचा
दारी पलंग सोण्यायाचा
बाई झाल्याता तिन्ही सांजा
दिवा लावावा राईबाई
तिनी सांजला केल काई
बाई सासु नी सास-यान
केली जतान माझ्यासाठी
आवशा चुडीराज
नवस केलय माझ्यासाठी
सासु नी सासईरा
देव फुलीत दोघ गेली
हळदिकुंकवाची रास
त्यांनी खंडूनी मला दिली
बाई सासु नी सासईरा
माझ्या देवा-या वईल देव
आम्ही जोड्यान फुल वाहू
आम्ही जोड्यान फुल वाहू
स्वलेखन प्रेमकवी सागर डवरी
दुरध्वनी :- 9773325548
१)..शब्दांचे अर्थ :-थोरल - मोठ.,
क्योर - कचरा. भरतार - नवरा.
किर मोर - पोपट मोर
कंथ - नवरा , कुंकबीवाची - कुंकवाची,
चीटी - पुढी
२)
मेशीईची - चीवा , बांबूची
वकिलाचा - लोखंडाचा.
आवशा - हौशी.
चुडीराज - नवरा
💐💐💐💐💐💐💐😊😊😊
No comments:
Post a Comment