💐माझी कविता 💐
🌷 माझी आई 🌷
********************
आभाळागत केली माया
पदराची दिली छाया
अशी कशी जाईल वाया
माया ममतेची
🌻🌻🌻🌻🌻🌻
कधीही ना केली तिने
आजाराची कुरकुर
सर्वांनाही दिला तिने
आधार पुरेपूर
🍀🍀🍀🍀🍀🍀
स्वतः राहुनीया उपवाशी
मज भरविले घास
माया ममतेचा आज
मज लागोयला ध्यास
🌹🌹🌹🌹🌹🌹
राञ राञ जागवून मज
थोपविले तिने
मांडीच्या झुल्यात मज
झोपविले तिने
💞💞💞💞💞💞
नेहमी म्हनायची आम्हांस
तुम्ही जेवलात कि
भरते माझे पोट
दुसरे काही नको मज
तुम्ही व्हा खुप खुप मोठं
👥👥👥👥👥👥👥
आठवता तुझे सारे गुण
मन येते ग भरुन
तुझ्याच आशिर्वादाने माये
जिवन जाईल सारे तरून
🙏🙏🙏🙏🙏🙏
पुण्ये आमुची मोठी म्हणूनी
माये जन्म घेतला तुझिया पोटी
तुझेच नाव घेता आई
दुःखे सरतील मोठी मोठी
☝☝☝☝☝☝
आठवता ते सारे क्षण
माझ्या डोळा येई पाणी
म्हणुनच वाटे मज
मन भरूनिया गावी
माया ममतेची गाणी
👏👏👏👏👏👏
माझी कविता .
सागर डवरी 😎 प्रेम कवि
हाँटसप नं 9773325548
🌱धन्यवाद🌱🙏
ताः 28/7/2015
Enter your comment...
ReplyDeleteआभारी आहे मी सर्वांचा
Delete