📝 माझी कविता 📝
💔विसरायचय मला तुला
*********************
विसरायचय मला तुला पण
अशी काय नशा आहे ग
तुझ्यात कि मी तुला
विसरू नाही शकत
तूझे ते बोलके नयन
न बोलताही खुप काही
सांगून जायचे ग मला
विसरून जा मला म्हणून
तू सांगून तर गेलीस पण...
तुझ्या त्या अदाकारीत मी
इतका डुबलो कि आता
काही केल्या मी नाही
विसरू शकत ग तुला
तुझे अचाणक सोडून जाने
हळव्याशा या नाजूक मनावर
घाव घातल्यासारखे
भासत होते ग. आणि
काचेसारखे खळकन
तुटलेल्या त्या मनाच्या
तुकड्यांनाही मी तेव्हा
जोडू शकत न्हवतो ग..
तुझ्या त्या आठवणींना
विसरून जाण्याचा एकदा
प्रयत्नही मी केला पण त्या
आठवणींची आठवण
दररोजच का यायची ग मला
आता हे प्रेमाचे रंग सारे
मनातून विरून गेलेत
आठवणींचे ते दिवसही आता
कायमचे सरून गेलेत
आणी तुझ्या आठवणींचे
आभाळ रिते झालय आता
त्याला नाही होत कसलाही
भास आता
नाही आहे त्याला प्रेमाची
त्या आस आता
बस्स....मन मोकळा श्वास
घेतय आता
*********************
📝 माझी कविता📝
📝सागर डवरी😎
💝प्रेमकवि 💔
व्हाँटसप नं 9773325548
ताः 17/03/2016
11:05 am
🙏🏻धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment