✍🏻 माझी कविता ✍
🌹आई माझी मागतोय 👵
***********************
ही कविता त्या मुलाची आहे
ज्याची आई जन्म देताच
त्याला सोडून देवाघरी जाते
आणी तो मुलगा आईच्या
प्रेमासाठी पोरका होतो
आणी आजही तो आईच्या
माया , ममतेसाठी भुकेला आहे
***********************
तु कशी होतीस ग आई
मला काहीच माहीत नाही
पण लोक म्हणतात आई आई
सौख्याचा सागर असते आई
मांगल्याचे सार असते आई
मग मला का ग तुझे ते
प्रेमळ सुख लाभले नाही ?
बाबा सांगायचे जवळ घेऊन
नेहमीच तुझी गोडवी
सर्वांशी तु प्रेमाने वागायची
सा-यांनाच आपुलकीने जपायची
मग तु माझ्यासाठी अजुन
थोडा वेळ का ग नाही थांबली ?
वर्गात विचारले शिक्षकांनी
आपल्या आईची माहीती
सांगायची सर्वांनी
प्रत्येकाने आपली आपली
आई मन भरून गायली
मग माझ्या मात्र नशिबी
आई का न राहीली ?
जगात अनेकांनी आईची
गोड थोरवी गायाली
पण तुझ्याविना आई
माझी स्वप्ने अधुरीच
मनात का ग राहीली
येशील का ग परतूनी एकदा
वाट पाहतोय ग तुझा शोना
मला तुला भेटायचे आहे
तुझ्या हातचा मार खायचा आहे
तुला घरभर फिरवून
खुप खुप सतवायचे आहे
तुझ्या हातचे दोन घास
लाडाने खायचे आहे
पुन्हा एकदा माघारी येऊन
पदरात तुझ्या मज घेशील का?
मायेचा हात डोक्यावरून
प्रेमाने फिरवशील का ?
मी डोळ्यात त्रान आणुन
वाट तुझी पाहतोय
देवाजवळ परत एकदा
आई माझी मागतोय
देवा जगातली सारी
सुखे घे तुला
माझ्या आयुष्यातील सर्व
आनंद घे तुला
पण लाडानं, मायेन वाढवनारी
माझी आई दे मला
माझी आई दे मला
****************************
ही माझी कविता जी मुले आईविना
पोरकी आहेत त्या मुलांना समर्पित
****************"***********
✍🏻माझी कविता ✍
🌹सागर डवरी 🌹
👍🏻प्रेमकवि 👵
व्हाँटसप नं 9773325548
🙏🏻धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment