काव्यविचार महाराष्ट्र मंच आयोजित
काव्यस्पर्धेसाठी
विषय:- सैनिक
शिर्षक:- सैनिकहो सलाम तुम्हाला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सैनिकहो माझा सलाम तुम्हाला
तुमच्या कर्तृत्व अन् ध्येयाला
तुम्ही सोडूनी सा-या घरदाराला
वाहिलेत प्राण त्या भारतभुला
देऊनी आपले स्वबलिदान
करता रक्षण तुम्ही भुमातेचे
धन्य धन्य ती माता सैनिकहो
जिने घातले जन्मांस अशा
तुमच्यासारख्या रांगड्या सुपुत्रांचे
नाही जानार वाया सैनिकहो
तुमची अनमोल अशी काया
पडत राहिल नेहमीच तुमची
आम्हा जनतेवर कोमल छाया
सैनिकी जिवनाला तुम्ही कवटाळलेत
तेव्हाच तुम्ही आमचे मन जिंकलेत
भारतमातेच्या सेवेसाठी तुम्ही
आपले परके सारे घरदार सोडलेत
तुमच्या हातून भारतमातेची
अखंडीत सेवा घडत राहो
आमचेही आयुष्य तुम्हांस लाभो
हिच प्रार्थना मी विधात्यास करतो
सलाम त्या जवानांना
सलाम त्या शहिदांना
आणी खरच सलाम
त्या माझ्या लढना-या
भारतभुच्या सुपुत्रांना
➖➖➖➖➖➖➖➖
स्वलिखीत :- प्रेमकवी सागर डवरी
दुरध्वनी क्र. 9773325548
No comments:
Post a Comment