✍🏻माझी कविता📝
👳🏻तेव्हाच कळेल बाप
〰〰〰〰〰〰
स्वतः मुलांना संभाळून बघा
त्यांच संगोपण करताना
होनारी ओढातान बघा
तेव्हाच कळेल बाप
पाठीवर असते त्याची
नेहमीच मायेची थाप
कधी तो ऊपाशीपोटी तर कधी
फाटक्या कपड्यात दिसतो
अरे तुझ्याच शाळेच्या फी साठी
गरीब लाचार झालेला असतो
कधी तुमच्या मुलाच्या फीसाठी
शिक्षकांना विनवणी करून बघा
त्याच्या डोळ्यांतली ती
मुलाच्या भविष्याची स्वप्ने बघा
तुम्हीही एकदा तुमच्या
मुलाची स्वप्ने पाहून बघा
कधी उपाशी तर कधी
फाटक्या कपड्यात राहून बघा
तेव्हाच कळेल बाप...
कधी शेताच्या कर्जापायी
विचारात पडलेला आणि
कर्जबाजारी असूनही
पोरांना मोठ्या शाळेत
घालण्याची त्याची स्वप्ने बघा
त्याची धडपड त्याची
तडफड जाणून बघा
आपल्या संसारासाठी
धडपड करून बघा
तेव्हाच कळेल बाप
पाठीवर असते त्याची
नेहमीच मायेची थाप
बाप म्हणण्यापेक्षा कधी
"बाबा'' म्हणून बघा
त्यावेळी त्याच्या डोळ्यांमधे
आलेले ते प्रेमळ अश्रू बघा
तेव्हाच कळेल बाप
पाठीवर असते त्याची
नेहमीच मायेची थाप
〰〰〰〰〰〰〰
📝माझी कविता✍🏻
🌹सागर डवरी प्रेमकवी❤
व्हाँटसप नं 9773325548
ताः 14/06/2017 9:05am
🙏🏼धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment