✍🏻माझी कविता📝
चाहूल पावसाची
☔☔☔☔☔☔☔
चाहूल पावसाची
चाहुल हिरवळीची
या डोंगरावरून
त्या डोंगराकडे
उगवना-या इद्रधणूची
चाहूल पावसाची
चाहूल काळ्याकुट्ट
भरून येना-या मेघांची
बळीराजाच्या जिवाला
मिळना-या अणेक अशा
स्वप्नांची अन त्याच्या
चेहऱ्यावर झळकणा-या
उस्फुर्त समाधानाची
चाहूल पावसाची
चाहुल कोकीळेची
झुडपामधून एका
पावसाच्या थेंबासाठी
तडफडना-या त्या
चातक पक्षाची
चाहूल पावसाची
चाहूल मनसोक्त पावसात
मोर लांडोरीच्या नाचना-या
त्या विलक्षण क्षणांची
अन पहिल्याच पावसात
भेटलेल्या व मनसोक्त
भिजून मनाची घालमेल
घालना-या त्या प्रियकर
प्रियकरणीची
चाहूल पावसाची
चाहूल सणांची
नागपंचमी,दहीहंडी
गणपती बाप्पा मोरयाची
चाहूल पावसाची
चाहूल मराठमोळ्या परंपरेची
सनासुदिला ऐकायला भेटणा-या
गौरी गणपती गीतांची
अन सासुरवासिनींच्या
भेटी गाठीतून मांडलेल्या
झिंम्मा फुगडीची
चाहूल पावसाची
चाहूल पाण्यातून बागडना-या
अन पाऊस आला रे
म्हणत पावसात मनसोक्त
भिजना-या त्या ऊनाड मुलांची
चाहुल पावसाची म्हणजे
अजूनही खुप काही
जे मलाही या काव्यातून
अजूनही मांडता आले नाही
☔☔☔☔☔☔☔☔
📝माझी कविता✍🏻
🌹सागर डवरी प्रेमकवी❤
📱व्हाँटसप नं 9773325548
ताः 7/06/2017 8:20am
🙏🏼धन्यवाद 🙏🏼
Nice
ReplyDelete