✍🏻माझी कविता📝
🌹हेच प्रेम आहे💘
➖➖➖➖➖➖➖➖
एक दिवस तु मला
विचारल होतस
प्रेम काय आहे?
सांगशील का मला !
मीही उत्तर दिल होत
कि वेळ आली कि
नक्कीच सांगेन तुला
पण ती वेळही निघून
गेली कदाचित तरीही
बघ मी आज सांगतोय तुला
तु मला
पहिल्याच भेटीत आवडलीस
दिसताच तु मला
मनास माझ्या भावलीस
तेव्हा पासून
तुलाच पाहत बसायचो
तु दिसली नाहीस तर
तुलाच शोधत रहायचो
बघ हेच प्रेम आहे
हेच प्रेम आहे
तुला समजल होत कि
मी तुझ्याकडे पाहतोय
तु दिसताच मला मी
गोड गाली हसतोय
तेव्हा तु चोरून
माझ्याकडे पाहतेस अन
गालातल्या गालात हसतेस
तेव्हा तुझ्या डोळ्यात
मला जे दिसले
हेच प्रेम आहे
हेच प्रेम आहे
तुझी माझी पहिली भेट
बोलली तर काहीच नाहीस
पण हळूवार प्रेमाने
स्पर्श मला केलास
सर्वांच्या नकळत हळूच
हातात हात घेतलास
अन् गोड हसत तो हात
काहि वेळ तसाच राहू दिलास
मीही काहीच बोललो नाही
हेच प्रेम आहे
हेच प्रेम आहे
आज सोबत नाहीस तु माझ्या
पण जीव माझा
तुझ्याचसाठी तडफडतोय
तुला भेटण्यासाठी
दिवस रात्र धडपडतोय
तुझ्याच आठवणीत अश्रू ढाळत
स्वप्नेही तुझीच पाहतोय
हेच प्रेम आहे
बघ हेच प्रेम आहे
तुला समजूनही माझ प्रेम
तु नासमज बनलीस
काय असत प्रेम
हे उगाचच विचारत बसलीस
प्रेम माझ जाणून घेण्याचा
प्रयत्नही न करता
मलाच सोडून निघून गेलीस
मी तर तुला सांगण्याचा
किती प्रयत्न केला
कि बघ हेच प्रेम आहे
ग हेच प्रेम आहे
➖➖➖➖➖➖➖➖
📝माझी कविता✍🏻
❤प्रेमकवी सागर🌹
व्हाँटसप नं 9773325548
ताः 14/ 05/2017 9:30pm
🙏🏼धन्यवाद 🙏🏼
No comments:
Post a Comment