माझी कविता
वाढदिवस
********************
वर्षातून एकदा आपला
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे
खुप सारे प्रेम देऊन जातो .
एका नवीन स्वप्नांची तो
सुंदर पहाट घेऊन येतो.
जीवनातल्या सोनेरी क्षणांना
पुन्हा नव्याने उजाळा देतो.
आयुष्याला आपल्या तो
एक योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे
हे हळूच सांगून जातो.
वर्षातून एकदा आपला
वाढदिवस येतो
खुप सा-या शुभेच्छा
सोबत घेऊन येतो
मनाला एक नवीन
आठवण देऊन जातो
*******************
प्रेमकवि - सागर
9773325548
No comments:
Post a Comment