✍🏻 माझी कविता 📝
❤नाती असुनी रक्ताची👨👨👦👦
* * * * * * * * * * *
आपल्याच मानसांना
आपल्याच मानसांची
किंमतच कधी कळली नाही
नाती असूनी ती रक्ताची
रक्ताला कधीच जुळली नाही
खुप केले त्यांच्यासाठी जे
अजूनही त्यांना कळले नाही
चुकुनही कधी पुन्हा माघारी
तोंड त्यांच्यावर फिरले नाही
मनाने कधीही आजपर्यंत
भावणा त्यांची छळली नाही
नाती असुनी.....
सर्वांनाच मी मनापासूनी
आपले असे मानाया गेलो
जो तो उठतो मलाच म्हणतो
मिच कुठेतरी वाया गेलो
आपुल्याच या बंधुभावांना
माया आमुची कळली नाही
नाती असुनी.....
परके रक्त ही कधी कधी
आपले असे वाटू लागते
मनात भावणा आपुलकीची
ठेवूनी त्याना भेटू वाटते
झाडे वेली पशु अन् पक्षी
यांच्या मनाची भाष्यभावणा
आजवर कुणास कळली नाही
नाती असुनी.....
आपल्याच मानसांना
आपल्याच मानसांची
किंमतच कधी कळली नाही
नाती असूनी ती रक्ताची
रक्ताला कधीच जुळली नाही
रक्ताला कधीच जुळली नाही
* * * * * * * * * * *
📝 माझी कविता ✍
😎सागर डवरी😎
❤प्रेमकवि🌹
व्हाँटसप नं📱
9773325548
ताः 17/11/2016
1:00 am
🙏🏼धन्यवाद 🙏🏼
No comments:
Post a Comment