माझी कविता ✍🏻
🤔का अस केलस तू ?👰🏻
〰〰〰〰〰〰〰〰
का...पहिलेच नाही
भेटलो आपण ?
का...आजवर एकटेच
राहिलो आपण ?
का...समोर असुनही
कधी बोललो नाही आपण ?
का...एकमेकांना आजवर
समजलो नाही आपण ?
का...तुला माझ्याशी
बोलता नाही आले?
का...मला माझे मन
तुझ्याशी मांडता नाही आले?
का...तुला माझे प्रेम
आजवर नाही कळले?
मग तरीही मन तुझे
दुसरीकडे का नाही वळले?
का...तु तुझ्या भावनांना
मनात दाबून ठेवलेस?
का...तुला कधी
प्रेमाचे गोड शब्द माझ्याशी
बोलता नाही आले?
का...तु कधीच मला
तुझ्याविषयी बोललीस नाहीस?
का...मला आजवर तुझ्या प्रेमासाठी
तडफडत ठेवलस?
का...तु मला याअगोदर
भेटून बोलली नाहीस?
किती मागे धावलो तुझ्या!
मग का....तु तेव्हा थांबलीस नाहीस?
अग तुझ्यासाठी सर्व
धावपळ करता करता
जिवावरती बेतल होत माझ्या
आणि तुलाही हे सारं
ठाऊक होत मग
का... तु मला एकदाही
कसा आहेस आता
वैगेरे विचारलस नाहीस?
का...तु माझ्या प्रेमाचा
अंत पाहिलास?
तुला न्हवते करायच प्रेम
तर का अगोदरच
सांगितलंस नाहीस मला?
का...तु मला असा
विरहाच्या दरीत
ढकलून निघून गेलीस.....?
काय चुक होती माझी ?
काय गुन्हा होता माझा ?
का...तेही जाता जाता
सांगीतलस नाहीस तू?
का...अस केलस तु,..? सांग....ना
का....का,...का.....सांग मला....
का अस केलस तू.....?
का...कशासाठी ?
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝माझी कविता✍🏻
❤सागर डवरी प्रेमकवी 🌹
व्हाँटसप नं 9773325548
ताः 21/05/2017 1:45am
🙏🏼धन्यवाद🙏🏼
Sunday, 21 May 2017
का अस केलस तू ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment