आमच्याविषयी थोडक्यात

नमस्कार मी सागर डवरी या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो.प्रेमकविता देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.आपणास नक्की आवडेल नवनवीन विषयां वर (प्रेम,सामाजिक परिथिती, राजकीय, आणि सर्वांना आवडतील अशा कविता ,लेख अपडेट होत राहणार आहेत. त्यासाठी या ब्लॉगवर नक्की भेट दया लेखन,काव्यरचना आवडल्यास कमेंटबाँक्स मधे कमेंट जरूर कळवा ..... आपलाच प्रेमकवी सागर

Monday, 4 December 2023

तात्पर्य कथा

छान तात्पर्य कथा.........आवडली तर जरूर लाईक करा व शेअर करा.. :-) :-) 

एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."

     भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..

     दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.

(समाप्त)

   *सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू* द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही. मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना.' प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त  आपण कर्म करत राहावं इतकंच!...फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो.
(इथे मी जीवाच्या म्हटलं कारण मनुष्य रूपातच भेट होईल असं नाही प्राणी, वनस्पती कोणत्याही जीवाच्या स्वरूपात कोणत्याही जन्मात वेळ ठरली की भेट होते)

Tuesday, 17 October 2023

प्रेमकवी सागर

*शुभ सकाळ कविवर्य मंडळी ......🙏🏼🌞*
*कसे आहात सर्व ....🙏🏼🌻*
*मजेत ना....🙏🏼😊*
*छान...🙏🏼🌹*

*जीवण हे असच असत*
*कधी हसवत तर कधी दुःखी*
*असे अनेक अणुभवांनी भरलेल*
*हे जीवनातील अणुभव असेच*
*घ्यायचे असतात व नव्या दिवसामध्ये*
*नवीन अणुभव खुप काही शिकवून जातात*
*मग चला तर नव्या दिवशी नवीन काही करूया*
*मिळून सारे आपुलकीचे ,माणुसकीचे नाते जपुया....*
*आपलाच प्रेमकवी सागर*
*9773325548*
*😊😊😊😊😊🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌻🌻✍🏼💐💐💐🌹🌹🌹शुभ प्रभात*

मी स्वतःला शोधताना

*_आजची काव्यरचना✍🏻✍🏻🥰_*

*_मी स्वःतला शोधताना..._✍🏻🥰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मी स्वतःला शोधताना स्वतःत हरवून जातो_*
*_मी स्वतःच्या या दुनियेत स्वतःस रमवून बघतो_*

*_मी स्वतःच्या जीवनात कित्येक दुःखेही साहतो_*
*_मी स्वतःच्या मनाला स्वतःच समजावून सांगतो_*

*_मी स्वतःच्या आत्मविश्वासाला स्वतःच बळ देतो_*
*_मी स्वतःच्या बळावर स्वःतला जगण्याचे धडे देतो_*

*_मी स्वतःच्या जगण्याला स्वतःच जबाबदार असतो_*
*_दुसऱ्याशी दोस्ती करता मनात कसलाच स्वार्थ नसतो_*

*_मी स्वतःला मनाच्या त्या आरशात डोकावून पाहतो_*
*_मी स्वतःच्या वागण्यात थोडासा बदल करू पाहतो_*

*_मी स्वतःला शोधताना स्वतःत माझा मी शोध घेतो_*
*_तेव्हा कुठे थोडासा मी माझा मला गवसतो..._*
*_तेव्हा कुठे थोडासा मी माझा मला गवसतो..._*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_लेखन प्रेमकवी सागर डवरी✍🏻💐_*
 *_वार:- रविवार २२ नोव्हेंबर २०२०_*
*_दुपारी 12 वाजता लेखन संपन्न_*